प्रियकरासोबतच्या ब्रेकअप्समुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. ब्रेकअप्स खरंतर स्वातंत्र्यच देतात… हा सल्ला दिलाय अभिनेत्री सोनम कपूर हिने. सोनम कपूरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मिनिटाचा एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये तिने प्रेमी युगुलांमधील नातेसंबंधांवर भाष्य केले आहे आणि आपलेही ब्रेकअप्स झाल्याची कबुली दिलीये.
या व्हिडीओमध्ये ती म्हणते, ब्रेकअप्स स्वातंत्र्य देणारे असतात. पहिला ब्रेकअप तर तुलनेत सोपा असतो. आपण तरूण असतो आणि आपले विचारही तितके प्रगल्भ नसतात. मला इतकंच सांगायचंय की जर तुम्ही प्रियकरासोबतच्या नातेसंबंधांबाबत गोंधळलेल्या असाल, तर सरळ ब्रेकअप करून टाका.
तीस वर्षीय सोनम कपूर दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्या आगामी प्रेम रतन धन पायोमध्ये अभिनेता सलमान खानसोबत अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होतो आहे.

Story img Loader