प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची कन्या आणि आपल्या फॅशनेबल अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या मनात एक खंत कायम आहे. अद्याप तिला आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आलेले नाही. यावर्षी पदवी प्राप्त करण्याचे तिने ठरवले आहे. ‘लॉरिअल फॅमिना वर्ल्ड अॅवॉर्डस् २०१५’साठी आलेल्या सोनमने शिक्षण पूर्ण करून पदवी न प्राप्त केल्याबद्दल खेद व्यक्त केला. परंतु, या वर्षी कोणत्याही परिस्थितीत पदवी प्राप्त करण्याचा निश्चय केला असल्याचे तिने सांगितले. कला शाखेतील पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश अर्ज करणार असल्याचेदेखील ती म्हणाली. ‘सावरिया’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘रांझना’ आणि ‘खुबसूरत’सारख्या चित्रपटातून काम केलेल्या सोनमचे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी चार वर्षे वाट पाहायला हवी होती, असे म्हणणे आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, बारावीनंतर मी शिक्षणाला रामराम केला आणि चित्रपटात काम करायला सुरुवात केली. तसे न करता अजून चार वर्षे थांबणे माझ्यासाठी शक्य होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा