सोनम कपूरला नंबर एकची अभिनेत्री नसल्याचे कोणतेही वाईट वाटत नसून, जीवनात मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी खूप आनंदी असल्याचे तिने म्हटले आहे. २००७ साली आलेल्या ‘सावरिया’ चित्रपटाद्वारे सोनमने आपल्या करिअरची सुरुवात केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या वाट्याला असफलता आली. यानंतर तिचा ‘दिल्ली-6’ हा चित्रपट आला. हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात अयशस्वी ठरला होता. या नंतर आलेल्या ‘आय हेट लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने सोनमला व्यावसायिक सफलता दिली. परंतु, या नंतर आलेल्या ‘थॅंक यू’, ‘मौसम’ आणि ‘प्लेयर्स’ या तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खास प्रदर्शन केले नाही.
सोनम म्हणाली, मी नंबर एकची अभिनेत्री नसले किंवा माझे चित्रपट खूप चालत नसले, तरी माझ्या वाट्याला आलेल्या आयुष्याची मी खूप आभारी आहे. मला एक चांगले कुटुंब, आई-वडील आणि बहिण मिळाली आहे.
आपल्या सुंदरतेसाठी आणि फॅशनसाठी चर्चेत असणारी सोनम म्हणाली, मला सुंदर दिसायला आवडते. यासाठी मला मदत करणारे लोक माझ्याबरोबर असतात. माझ्याकडे एक स्टायलिस्ट. मेकपमन आणि हेअर स्टायलिस्ट आहे. मी सुंदर दिसण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. मी स्वत:ला भाग्यशाली समजत असून, देवाकडून मिळालेल्या या आयुष्यासाठी आनंदी आहे. मला असे काम मिळाले आहे, जे मी करू इच्छिते आणि ज्याचा मी पुरेपूर आनंद लुटत आहे.
प्रत्यक्ष जीवनात फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मौसम’ सारख्या चित्रपटात साध्या मुलीची भूमिका करत आहे. सोनम ‘रांझणा’ चित्रपटात अभय देओलबरोबर दिसणार आहे. अभय आणि सोनम व्यतिरिक्त या चित्रपटात ‘कोलावरी डी’ गाण्यामुळे चर्चेत आलेला अभिनेता-गायक धनुषसुद्धा दिसणार असून, त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय कुमार बनवणार मार्शल आर्टवर चित्रपट
मुंबई
आपल्या मार्शल आर्टच्या प्रेमासाठी प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार मार्शल आर्टवर आधारित चित्रपट बनवू इच्छित आहे. चित्रपटात येण्यापूर्वी अक्षय कुमारने बँकॉकमध्ये मार्शल आर्टचे शिक्षण घेतले होते. ब्रिटन येथून फोनवर बोलताना अक्षय म्हणाला की, मार्शल आर्ट माझ्यासाठी हृदयाच्या खूप जवळ असून, मला यावर एक चित्रपट बनवायचा आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेचे काम सुरू असल्याचे देखील त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, खेळाविषयीचे माझे प्रेम कधीही कमी होऊ शकत नही. मार्शल आर्टवर माझे मनापासून प्रेम असून, या खेळासाठी जे काही करता येण्यासारखे आहे, ते मी करू इछितो. चित्रपट अभिनेता असण्याच्या आधी मी एक मार्शल आर्ट फायटर आहे. अक्षयच्या ‘हरी ओम प्रॉडक्शन’द्वारे निर्माण होणाऱ्या या चित्रपटात तो स्वत: काम करण्याची शक्यता फार कमी आहे. चित्रपटात त्याच्यासाठीची एखादी भूमिका असेल किंवा नसेल याची माहिती नसल्याचे अक्षयने सांगितले. मिलन लुथ्रांच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई अगेन’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार दिसणार आहे. हा चित्रपट २०१० साली आलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ चा पुढील भाग आहे.