अभिनेत्री सोनम कपूर ही बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या कपूर घराण्याची एक वारसदार. तिचा जन्म ९ जून १९८५ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. सोनम बॉलिवूड स्टार अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगी आहे. तीन भावांडांमध्ये सोनम सगळ्यात मोठी बहिण आहे. तिच्याशिवाय हर्षवर्धन कपूर आणि रिया कपूर ही भावंडही आहेत. हर्षवर्धनने काही महिन्यांपूर्वीच दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोनम गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत सक्रिय आहे. आतापर्यंत तिने अनेक हिट सिनेमेही दिले आहेत. अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत आलेल्या सोनमला मात्र दिग्दर्शक बनायचे होते. अभिनेत्री होण्याच्याआधी ती स्वतः सह- दिग्दर्शक म्हणूनही काम करत होती. २००५ पर्यंत सह-दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर २००७ मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत तिने सावरिया या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर २००९ मध्ये आलेला ‘दिल्ली ६’, २०१० मध्ये आलेला ‘आएशा’, २०११ मध्ये ‘थॅक्यू’ आणि ‘मौसम’ तर २०१२ मध्ये ‘प्लेअर्स’ यांसारखी मल्टिस्टारर सिनेमेही केले. २०१३ मध्ये तिचे ३ नवनीन सिनेमे प्रदर्शित झाले आणि तिनही तुफान गाजले. ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमांचा यात समावेश आहे. सिनेसृष्टीत एवढी वर्ष काम करताना सोनमने अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केले. या सिनेमांनंतर तिने ‘नीरजा’ हा सिनेमा केला. या सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिची खूप प्रशंसाही झाली.

२००९ मध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘दिल्ली- ६’ या सिनेमात सोनमसोबत अभिषेक बच्चन याने काम केले होते. समिक्षक राजीव मसंदने आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘सोनम कपूर ‘दिल्ली- ६’ मध्ये छान दिसते. तिचा अभिनय इतरांपेक्षा वेगळा आहे. एका पारंपारिक महिलांचे ती प्रतिनिधित्व करते.’ सोनम निर्माते बोनी कपूर, अभिनेता संजय कपूर आणि संदीप मारवाह यांची पुतणी आहे. तिने सिनेसृष्टीत आपली ओळख फार मेहनतीने बनवली आहे. सोनम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिला फोटो काढायला फार आवडते.