सलमान खान आणि सोनम कपूर यांच्या बहुचर्चित ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सोनमने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी हे पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर राजश्री बॅनरची खासियत असलेल्या टिपिकल रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या साडीतील सोनम आणि तिच्याकडे प्रेमाने पाहणारा सलमान खानचे हे पोस्टर बॉलीवूड चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधील सोनमचा लूक ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या लुकशी मिळताजुळता असल्याचीही चर्चा आहे. सलमान आणि सूरज बडजात्याने यापूर्वीही यशस्वी चित्रपट केले आहेत. त्यात ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर तब्बल १६ वर्षांना बडजात्या आणि सलमान एकत्र काम करत आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा