बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे. नुकतंच तिच्या बाळाची पहिली झलकही समोर आली आहे. दरम्यान ती सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. सोनमने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : प्रसिद्ध गायिकेशी विमान कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक, ट्विटरवरून सांगितला अनुभव

सोनम कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली, ज्यात सोनम कपूरने लिहिले की, “केवळ तीच ढेकर क्यूट असते जी लहान बाळांची असते.” या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की, आई झाल्यानंतर सोनम कपूरचे आयुष्य खूप बदलले आहे. 

इतकेच नाही तर अलीकडेच अशी बातमी आली होती की, सोनम आणि आनंद लवकरच आपल्या मुलाचे नाव बारसे करणार आहेत. यासाठी ते एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील करणार आहेत.  नुकतंच एका मुलाखतीत संजय कपूरला सोनमच्या मुलाच्या नावाविषयी विचारण्यात आलं होतं, ज्यात ते म्हणाले, “बाळाचे नाव के असेल याबद्दल मला काहीच कल्पना नाही, पण सोनम आणि आनंद नक्कीच नावाचा विचार करत असतील.” बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नेटकरी सोनम आणि तिच्या मुलावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. बाळाच्या येण्याने अनिल कपूर यांच्या घरात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “नातू आजोबा हाक देणार म्हणून…” सोनम कपूरने केला वडिलांबद्दल खुलासा

दरम्यान सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतंच सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आता प्रसूतीनंतर सोनम जवळपास ६ महिने मुंबईत तिच्या पालकांसोबत राहणार आहे.

Story img Loader