कान फिल्म फेस्टिव्हलच्या पाचव्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर रेड कार्पेटवर अवतरली होती. सोनमसह अनेक हॉलिवूड स्टार्सनीही कानच्या रेड कार्पेटची शोभा वाढवली. यामध्ये फ्रिदा पिंटो, हिलेरी स्वांक, पेरिस हिल्टन, रॉबर्ट पॅटिनसन, सिल्वेस्टर स्टेलॉनसह अनेक स्टार्सचा यामध्ये समावेश होता.
फोटो गॅलरी: सोनम कपूर ‘कान’च्या रेड कार्पेटवर
आपल्या लूकमुळे नेहमी चर्चा एकवटणारी बॉलीवूड दिवा सोनमने यावेळी काळ्या रंगाचा एली साब गाऊन परिधान केला होता. तिची हेअरस्टाईलसुद्धा हटके होती. ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावून तिने आपला लूक पूर्ण केला होता. २८ वर्षीय सोनम आज रॅम्पवरही चालणार आहे. सोनमने २०११ साली कान महोत्सवामध्ये पदार्पण केली होती. फॅशनबाबत असलेली समज यामुळे तिने अनेकांची वाहवाही मिळवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा