बॉलिवूड स्टाईल दिवा सोनम कपूर नक्कीच एक समर्पित अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘डॉली की डोली’ चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याच्या चित्रीकरणासाठी तापाने फणफणत असतानादेखील तिने सतत १६ तास शुटिंग केले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत ‘डॉली की डोली’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरलेला अभिषेक डोग्रा टि्वटरवरील आपल्या संदेशात म्हणतो, ‘डॉली की डोली’च्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. ‘डॉली’चा उत्साह कधीच कमी होत नाही, तापाने फणफणत असतानादेखील सोनम कपूरने ‘डॉली’चा उत्साह कायम ठेवला. माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अतोनात मेहनत घेत असल्याचा संदेश सोनम कपूरने टि्वट केला आहे. चित्रपटाचा निर्माता अरबाझ खानने टि्वटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे, सोनाम कपूर, राज कुमार राव आणि पुलकीत सम्राट यांच्याबरोबरचे ‘डॉली की डोली’चे सात दिवसांचे आऊट-डोअर शुटिंग पूर्ण झाले. खूप चांगले शुट होते, अतिशय आनंद झाला. चित्रपटात सैफ अली खानदेखील काम करत असून, तो एका राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा