स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत असून, या आजाराने आता बॉलीवूडकरही धास्तावले आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासह त्यांची पत्नी चित्रपट समीक्षक अनुपमा आणि मुलाला स्वाइन फ्लू झाल्याचे कळले होते. त्यानंतर आता बॉलीवूड दिवा सोनम कपूर या आजाराच्या विळख्यात सापडली आहे.
प्रेम रतन धन पायो’या चित्रपटाचे राजकोटमध्ये चित्रीकरण सुरु असतानाच सोनमला स्वाईन फ्लूची लागण झाली. गुजरातमधील राजकोटमध्ये शूटिंगदरम्यान सोनमला सर्दी खोकल्याच्या त्रास सुरू झाला होता. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये तिला स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले. सोनमच्या खासगी प्रशिक्षकाला स्वाईन फ्लूची बाधा झाली होती. त्याच्या संपर्कात राहिल्याने सोनमला या आजाराची लागण झाली असण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सलमान खान हा सोनमचा सहकलाकार आहे. सलमान आणि सोनमचे जास्तीत जास्त काम एकत्र असल्यामुळे सलमानलाही स्वाइन फ्लू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सलमानने सदर आजाराची चाचणी करून घेतली असता त्याला स्वाइन फ्लू नसल्याचे स्पष्ट झाले.
सोनम कपूरवर आता मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा