हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खुबसूरत’ चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी अजरामर केलेली व्यक्तिरेखा आता अभिनेत्री सोनम कपूर साकारणार असून या व्यक्तिरेखेला आधुनिकतेचा स्पर्श देण्याचा आपला मानस असल्याचे सोनमने म्हटले आहे.
रेखासारख्या अभिनेत्रीने साकारलेली भूमिका करण्यासाठी आपली निवड झाली असून हे आव्हान आहे. रेखाने साकारलेल्या व्यक्तिरेखेला अवखळपणाचा आधुनिक स्पर्श करण्याचा आपला मानस असला तरी १९८०च्या दशकातील या चित्रपटाचे कथानक मात्र नव्या स्वरूपातील असल्याचे सोनमने सांगितले.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी सोनमने अभिनेत्री रेखा यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी आपण रेखा यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी असून रीमेकचे दिग्दर्शन शशांक घोष करणार आहेत आणि निर्माते अनिल कपूर आहेत. ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा