बॉलीवूड सुंदरी सोनम कपूर आणि दबंग सलमान खान रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. ‘सावरिया’ चित्रपटानंतर हे दोघे आता सूरज बडजात्याच्या चित्रपटात रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे.
फोटो गॅलरीः सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सलमान खान
आम्ही सध्या तारखांवर काम करत आहोत. एक दोन दिवसांमध्ये आम्ही चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची निवड करू. चित्रपटाकरिता सोनमची निवड होण्याची शक्यता आहे, असे राजश्री प्रॉडक्शनच्या सूत्रांनी म्हटले आहे. सदर चित्रपटाचे चित्रिकरण जूनमध्ये सुरु होणार आहे. सोनम कपूर आगामी ‘बेवकूफिया’ चित्रपटात ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा