गेली अनेक वर्षे अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. ‘लॉरिएल’ या फ्रेंच उत्पादनाची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ऐश्वर्याचे नाते जुनेच असल्याने ‘कान’च्या रेड कार्पेटवर तिचे दरवर्षी शाही स्वागत होते. आता ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री सोनम क पूर पहिल्यांदाच ‘कान’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सध्या तरी ‘कान’ महोत्सव आणि आपले चित्रपट यांच्यावरच सगळे लक्ष कें द्रित झाले असून वडील अनिल कपूर यांच्याशिवाय कोणताही महत्त्वाचा माणूस आपल्या आयुष्यात नाही, असे सोनमने स्पष्ट केले आहे.
‘लॉरिएल’च्या निमित्ताने आलेली ‘कान’ महोत्सवाची संधी आणि रेड कार्पेटवर मिरवण्यासाठी सुरू असलेली तयारी याविषयी सोनम कपूरने प्रसिद्धीमाध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला. रेड कार्पेटवर येणाऱ्या अभिनेत्री कोणत्या प्रकारचे गाऊन घालतात, काय फॅशन करतात, या गोष्टी कान महोत्सवात नेहमी चर्चिल्या जातात. पण या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व करताना आपण संपूर्ण देशी अवतारात रेड कार्पेटवर उतरणार असल्याचे सोनमने सांगितले.

Story img Loader