बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोनमच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबीय सध्या आनंद सेलिब्रेट करत आहेत. मात्र आई झाल्यानंतर सोनम मात्र सोशल मीडियावर भलतीच ट्रोल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – मुलगा झाला हो! सोनम कपूर-आनंद आहुजाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाली…

सोनमने गुडन्यूज दिल्यानंतर कपूर कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. त्याचबरोबरीने सोनमने देखील आपण आई झाल्यानंतर खास पोस्ट शेअर केली. आता तर चक्क तिने काही फोटो शेअर केले आहेत. सोनमचे हे फोटो तिच्या गरोदरपणातील आहे. पण सोनमने शेअर केलेल्या या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

सोनमने हे फोटोशूट वोग या मासिकासाठी केलं होतं. या फोटोमध्ये तिचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अंतरवस्त्र परिधान न करता तसेच बेबी बंप दाखवताना सोनम यामध्ये दिसत आहे. तिचा हा लूक पाहूनच नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. पण या फोटोंमध्ये सोनमचा प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – “संपूर्ण बॉलिवूड पाकिस्तानमध्ये…” बोमन इराणी यांचं ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

अंगप्रदर्शन करण्याची गरज काय?, अशाप्रकारचं फोटोशूट करून काय मिळवलं?, याला फॅशन म्हणत नाहीत अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सोनम आता पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तसेच तिच्या या हटके फोटोशूटमुळे सेलिब्रिटींनी बेबी बंप दाखवणं गरजेचं असतं का? असा प्रश्न देखील नेटकरी विचारत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor troll for her pregnancy photoshoot goes viral on social media see details kmd