बॉलिवूडमध्ये आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजेच सोनम कपूर. सोनम नेहमीच तिच्या लुक्समध्ये एक्सपेरिमेंट करताना दिसते. ती तिच्या फॅशनसेन्समुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनमने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम Harper’s Bazaar India या मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. त्यातलाच हा एक फोटो आहे. या फोटोमध्ये सोनमने सिल्क डसेज सॅटिन ड्रेस आणि ट्राउजर परिधान केलेली आहे. या लूकमध्ये ती हॉट दिसत आहे. यावरून इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी सोनमची स्तुती केली आहे. तर दुसरीकडे सोनमला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “काकू ही कोणती डिझाइन आहे?”, दुसरा नेटकरी म्हणाला, “गरूडाचे रूप घेतलेस का?” सोबतच सोनमला एका नेटकऱ्याने “वल्गर” म्हटलं आहे.

सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये आहेत. सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे सोनमला तिच्या कुटुंबाची किती आठवण येते हे ती सांगत असते.

 

Story img Loader