बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमी तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनम कपूर हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. नुकतंच सोनम कपूरने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोनम कपूरचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात सोनम कपूरच्या मांडीवर एक गोंडस बाळ दिसत आहे. पण या व्हायरल होणाऱ्या फोटोमागचे सत्य नुकतंच समोर आलं आहे.

सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. सध्या सोशल मीडियावर सोनम कपूरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोत तिने बाळाला जन्म दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ती तिच्या बाळाला घट्ट मिठी मारत असल्याचेही दिसत आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

“मला तो माझ्या भावाप्रमाणे वाटला होता पण…”; ‘अशी’ होती सोनम कपूर-आनंद आहुजाची पहिली भेट

मात्र नुकतंच हा फोटो खोटा असल्याचे समोर आलं आहे. सोनम कपूर हा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. एका दुसऱ्या फोटोसोबत छेडछाड करत हा फोटो बनवण्यात आला आहे. त्यामुळे सोनम कपूरने बाळाला जन्म दिला असा दावा करण्यात आलेला फोटो पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आलं आहे.

विश्लेषण : सोनम कपूरच्या डोहाळे जेवणात बॉडीकॉन ड्रेसमुळे चर्चेत आलेला लियो कल्याण नक्की कोण?

नुकतंच सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यात तिने आनंद आहुजाचा एक फोटो शेअर केला होता. मला माझ्या आवडत्या माणसाची आठवण येत आहे, असे तिने यात म्हटले होते. दरम्यान सध्या सोनम कपूरने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. ती लवकरच ब्लाइंड या चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे दिसणार आहेत. बाळ झाल्यानंतर सोनम कपूर या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे.

Story img Loader