बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे चित्रपटात काम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची भरमसाठ फी आकारतात. अनेक वेळा चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कलाकारांना आवडते आणि त्यांच्याकडे तारखाही असतात. पण कमी पैशांमुळे ते चित्रपट साइन करत नाहीत. पण अनेकदा असंही घडतं की कलाकार कोणतेही पैसे न घेता त्यांच्या स्वखूशीने एखाद्या चित्रपटात काम करतात. बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूरच्या बाबतीत ही असंच झालंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सोनम कपूरला दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी २००९ मध्ये ‘दिल्ली ६’ चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी साईन केलं होतं. या चित्रपटातील सोनमच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक करत चांगला प्रतिसाद दिला. ‘दिल्ली ६’ चित्रपटातील मस्सकलीची प्रेक्षक आजही आठवण काढत असतात. बॉलिवूडच्या ‘मस्सकली’ला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक राकेशने त्याच्या पुढच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातही सोनमला साईन केलं. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत होता आणि सोनमचे काही मोजकेच सीन्स होते.

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’मध्ये ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटासाठी सोनम कपूरच्या फीसबाबत मोठा खुलासा केलाय. या चित्रपटातील ‘बिरो’ची भूमिका समजून घेतल्यानंतर सोनमने चित्रपटासाठी साईन केलं होतं. सोनम कपूरने या चित्रपटासाठी केवळ ११ रूपयांची फीस घेतली, असं दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी म्हटलंय. एखादी सेलिब्रिटी इतक्या कमी पैशांमध्ये चित्रपटात काम कसं काय करू शकते? असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण होतो. यामागचं कारणही दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहराने सांगितलंय.

‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटासाठी सोनम कपूरने केवळ ११ रूपयांची फीस घेण्याचं कारण म्हणजे त्यांचा फिल्म इंडस्ट्रीतील जूना प्रवास होय. या चित्रपटाच्या आधी दोघांनी एकत्र ‘दिल्ली ६’ चित्रपटात सोनम कपूरने काम केलं होतं. त्यादरम्यान सोनम आणि दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी एकत्र काम करण्याचा अनुभव घेतला होता.

केवळ ११ रूपयांची फीस घेऊन सोनम कपूरने अवघ्या सात दिवसांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. यात ती काही मोजक्या सीन्स व्यतिरिक्त दोन गाण्यांमध्ये आपला अभिनयाची जादू दाखवताना दिसून आली. ‘मेरा यार’ आणि ‘ओ रंगरेज’ या दोन गाण्यांमध्ये ती झळकली होती.

आणखी वाचा- Bigg Boss OTT Premiere: मलायका अरोराच्या ग्लॅमरचा तडका; डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षक घायाळ, पहा व्हिडीओ

राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा नुकताच ‘तुफान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसला. तसंच त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसून आली. सोनम कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनम कपूर अखेरीस 2019 मध्ये ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात दुल्कर सलमानसोबत दिसून आली होती. सध्या सोनम कपूर ‘ब्लाइंड’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनम व्यतिरिक्त पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor was paid only 11 rupees for her role in bhaag milkha bhaag prp