कान महोत्सवात अभिनेत्री सोनम कपूर हिने पिसांसारखा जो एली साब गाऊन परिधान केला होता त्यावर ट्विटर या मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळावर अनेक विनोद करण्यात आले असून टिप्पणीही केली गेली आहे. कान महोत्सवात रेड कार्पेटवरून चालताना तिने हा गाऊन परिधान केला होता. एकाने त्यावर म्हटले आहे की, सोनम कपूरचा एली साब गाऊन हा असा होता की, रिहानाने ऑमलेट ड्रेस घालावा अन त्याचे स्क्रँबलड एग्ज व्हावे. यात रिहानाच्या मेट गाला ड्रेसचा उल्लेख करण्यात आला आहे.
सोनम कपूरचा गाऊन म्हणजे कॉर्नफ्लेक्ससारखा होता, ती कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेड क्रम्समध्ये असल्यासारखी वाटते असेही एकाने म्हटले आहे. सोनम कपूरचा पोशाख पाहून गवताच्या गंजीची आठवण होते असेही ट्विट करण्यात आले आहे. तर काहींनी तो फर असलेल्या कुत्र्यासारखा गाऊन होता असे म्हटले आहे. सोनम कपूरला कान महोत्सवात काही काम नसेल तर तिने तिच्या गाऊनचे स्वेटर्स शिवावेत असेही काहींनी म्हटले आहे. या काऊचर गाऊन बरोबर तिने नीट बन, पिंक लिप्स व टिअरड्रॉप इयररिंग्जचा साज
चढवला होता.
दरवर्षी तिच्या पोशाखाची प्रशंसा होते पण यावेळी ट्विटरवर वेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पाचव्यांदा तिने सौंदर्यप्रसाधनासाठी सादरीकरण केले. पूर्वी तिने न्यूड पिंक ड्रेस, स्ट्रक्चर्ड कोबाल्ट ब्लू गाऊन, न्यूड कॉकटेल सारी व ब्लॅक ऑर्नेट ड्रेस यांना प्राधान्य दिले होते.

Story img Loader