‘रांझना’ अभिनेत्री सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘खुबसूरत’ १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. १९८० साली रोमॅण्टिक-कॉमेडी चित्रपटाचा हा रिमेक आहे. ‘खुबसूरत’च्या रिमेकची निर्मिती अनिल कपूर करत असून, यात सोनम व्यतिरीक्त फावद खान, किरण खेर, रत्ना पाठक शाह आणि आमिर रझा हुसेन यांच्या भूमिका आहेत.
चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी ट्विट केले आहे की,

‘खुबसूरत’ चित्रपटाने रेखाजींच्या पावलावर पाऊल ठेवणा-या सोनाक्षीने रेखा या आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे नुकतेच म्हटले होते. ” मी रेखाजींची खूप मोठी चाहती आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीत त्यांच्यापासून मला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. चित्रपटसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्रीसाठी त्या प्रेरणास्थानी आहेत. मी हृषिकेश मुखर्जींचा ‘खुबसूरत’ आणि इतरही काही चित्रपट पाहिले आहेत.”, असे सोनम म्हणाली.
मूळ खुबसूरत चित्रपटात राकेश रोशन, रेखा, अशोक कुमार, केश्तो मुखर्जी आणि दीना पाठक या प्रसिद्ध कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते तर पटकथा शानू बॅनर्जी आणि डायलॉग्ज गुलजार यांनी लिहले होते.

Story img Loader