अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या आगामी ‘रांझणा’ चित्रपटातील शाळकरी मुलीच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या ‘गुड्डी’ चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. १९७१ साली आलेल्या जया बच्चन यांच्या या चित्रपटातून सोनमने प्रेरणा घेतली आहे. या चित्रपटात सोनम वाराणशीमधील एका मध्यमवर्गीय शाळकरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनमने सांगितले की, ‘गुड्डी’ चित्रपटातील जया बच्चन यांचे पात्र एका चुलबुली मुलीचे आहे. ती पुढे म्हणाली, मला ‘रांझणा’ चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी प्रेरणेची आवश्यकता होती, कारण माझे शाळकरी जीवन हे पारंपरिक आणि भिन्न स्वरूपाचे असल्याने मला सुरुवातीपासूनच मदतीची आवश्यकता होती. या भूमिकेसाठी ‘गुड्डी’ हा चित्रपट मी दोनदा पाहिला. ‘रांझणा’ या चित्रपटात शाळकरी मुलीची भूमिका साकारणे, ही माझ्यासाठी खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे.

Story img Loader