सौदर्यं आणि गुणवत्तेच्याबाबतीत अभिनेत्री सोनम कपूर ही माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्यापेक्षा उजवी असल्याचे मत अभिनेता सलमान खान याने व्यक्त केले आहे. यापूर्वी मोठ्या पडद्यावर सलमानसोबत माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, भाग्यश्री आणि सोनाली बेंद्रे या अभिनेत्रींच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र, या सगळ्यांच्या तुलनेत सोनम कपूर अधिक सुंदर आणि गुणवत्तापूर्ण असल्याचे सलमानने सांगितले. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील माधुरीच्या कामापेक्षा सोनमने ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये चांगले काम केल्याचेही सलमानने यावेळी सांगितले. मात्र, सोनमने स्वत:ची अशाप्रकारे माधुरी किंवा ऐश्वर्याशी तुलना करणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यांनी याअगोदर खूप चांगले काम करून ठेवले आहे. सौदर्यं आणि गुणवत्तेच्याबाबतीत मी ऐश्वर्या आणि माधुरी यांच्या जवळपासही नसल्याचे सोनम कपूरने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा