बॉलीवूड स्टाइल दीवा सोनम कपूर सध्या तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटासाठी सर्वत्र नावाजली जात आहे. चित्रपटामध्ये सशक्त स्त्रीची भूमिका साकारणारी सोनम ख-या आयुष्यातही तशीच आहे. एका ज्येष्ठ पत्रकार महिलेला अंगरक्षकाकडून चुकीची वागणूक मिळताना पाहिल्यावर सोनमने त्या अंगरक्षकाला लगेच फटकारत तंबी दिली.
झाले असे की, रेड कार्पेटवर सोनमचे आगमन होताच सर्व पत्रकारमंडळी तिच्याकडे धावली. सोनमची मुलाखत घेण्यासाठी पत्रकारांची धडपड चालू होती. त्यामध्ये एका ज्येष्ठ महिला पत्रकाराचाही समावेश होता. दरम्यान, यावेळी अचानक समोर आलेल्या अंगरक्षकाने सदर महिला पत्रकारास ढकलले. हे दृश्य सोनमने पाहिले आणि तिला राग अनावर झाला. ती तडक त्या अंगरक्षकाकडे गेली.  पत्रकार त्यांचे काम करत आहेत, असे म्हणत सोनमने अंगरक्षकाला फटकारले. या सर्व प्रकारानंतर अंगरक्षकाने सोनमची आणि महिला पत्रकाराची माफी मागितली.

Story img Loader