दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हा सध्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यावमुळे चर्चेत आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असे वक्तव्य किच्चा सुदीपने केले. त्याच्या विधानामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला. त्यानंतर या मुद्द्यावर अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये ट्विटरवर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता सोनू सदने भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीतही फार जास्त सक्रीय असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करत आहे. त्यासोबत त्याचे हिंदी चित्रपटही चांगलेच सुपरहिट ठरले आहेत. नुकतंच या संपूर्ण वादावर सोनू सूदने स्पष्टीकरण दिले आहे.

विश्लेषण : हिंदी भाषेवरुन अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या

‘इंडियन एक्सप्रेस’ या वेबसाईटसाठी बोलताना सोनू सूद म्हणाला, “हिंदी ही फक्त एक राष्ट्रीय भाषा आहे, असे मला वाटत नाही. भारतात एकच भाषा आहे, ती म्हणजे मनोरंजन. तुम्ही कोणत्या क्षेत्राशी संलग्न आहात, हे इथे महत्त्वाचे नसते. तुम्ही लोकांचे मनोरंजन केल्यास ते देखील तुमच्यावर प्रेम करतात आणि आदराने तुमचा स्वीकारही करतात.”

नेमकं प्रकरण काय?

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने हिंदी भाषेवर एक वक्तव्य केले होते. “सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने म्हटले होते.

त्यावर अजय देवगणने ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते. “किच्चा सुदीप…, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन”, असे ट्विट अजय देवगण याने केले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या वादानंतर किच्चा सुदीप आणि अजय देवगणमध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले.

“हिंदी राष्ट्रीय भाषा नसेल तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब का करता?”, अजय देवगणचा दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर सवाल

दरम्यान अजय देवगणच्या ट्विटनंतर मात्र किच्चा सुदीपने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. किच्चा सुदीपने या संदर्भात सलग तीन ट्विट केले. “सर, मी ज्या संदर्भात हे वक्तव्य केले होते, तो मुद्दा तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. कदाचित मी तुम्हाला भेटल्यावर माझा संपूर्ण मुद्दा तुमच्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकेन. मला असे बोलायचे नव्हते. कोणाच्याही भावना दुखावणे, कोणत्याही वादाला तोंड फोडणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे, मी हे असे का करेन सर. मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय अजून पुढे वाढवायचा नाही. मला असे वाटतं की हा विषय आताच संपायला हवा. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या बोलण्याचा हे उद्दिष्ट नव्हते, जे सध्या समजलं जात आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. मी तुम्हाला लवकरच भेटेन, अशी आशा व्यक्त करतो, असे त्याने म्हटले होते.