बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतला ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.हा पुरस्कार मिळाल्यामुळे कंगनाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र, दुसरीकडे कंगनाला पद्मश्री मिळाल्याने अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे. त्यात फक्त कंगनाचे विरोधी नाही तर सोनू सूदचे चाहते देखील आहेत.
सोनूच्या चाहत्यांनी ट्विटरवर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. सोनूने इतक्या लोकांना मदत करूनही त्याला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला नाही. तर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की कंगना फक्त सरकारच्या समर्थनाथ असते म्हणून तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. सोनूने इतक्या लोकांची मदत केली तर त्याला पद्मश्री पुरस्कार द्यायला पाहिजे होता असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर
आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…
आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?
कंगनाला ट्रोल करत कमाल आर खान म्हणाला, “जर बॉलिवूडमध्ये कोणाला पद्मश्री पुरस्कार हवा असले, तर त्याने लगेच सॉफ्ट पॉर्न बनवायला सुरुवात करा, कारण तुम्ही सोनू सूदसारख काम केलं तर आयकर विभाग तुमच्या घरावर छापे टाकतील.” एका नेटकऱ्याने कंगनाचे ‘मर्डर’ या चित्रपटातील काही फोटो शेअर करत “वाह रे मोदी तेरा न्याय?, सोनू सूद पे की इनकमटैक्स की रेड…., कंगना को दिया पद्मश्री अवार्ड…..ये रिश्ता क्या कहलाता है।” तिसरा नेटकरी म्हणाला, सोनूचा फोटो शेअर केला आणि म्हणाला, “हजारो लोकांना मदत करण्यासाठी, त्याने त्याचं सगळं काही दिलं. तर दुसऱ्या बाजुला कंगनाचा फोटो शेअर करत म्हणाला, तिने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली, आणि तिला पद्मश्री पुरस्कार मिळाला.”