पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूडसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हळहळ व्यक्त करत आहे.

अभिनेता सोनू सूद याने नुकतंच सिद्धू मुसेवाला यांच्याबद्दल एक ट्विट केले आहे. सोनू सूदने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सोनू सूदने ट्विटरवर सिद्धू यांचा त्यांच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आणखी एका आईचा मुलगा निघून गेला, असे त्याने म्हटले आहे. याद्वारे सोनू सूदने अप्रत्यक्षपणे या घटनेचा निषेध केला आहे.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

“मला चुकीचे समजू नका…”, सिद्धू मुसेवाला यांची शेवटची पोस्ट चर्चेत

नेमकं प्रकरण काय?

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली.

मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पंजाब पोलिसांशिवाय हरियाणा आणि इतर राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस पथक दोन्ही वाहनांचा शोध घेत आहे. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.