अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासुन त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या न्यूड फोटोशूटवरून रणवीर सिंगविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. या फोटोशूटवरून बरेच वादविवाद झाले. अनेक बॉलिवूड कलाकारांनी रणवीरला समर्थन दर्शवले तर काहींनी यावर कमेंट करण्याचे टाळले. आता अभिनेता सोनू सुदने या फोटोशूटवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीरने हे न्यूड फोटोशूट केल होत. या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. रणवीरचा हा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. अभिनेता सोनू सुदने मात्र याबाबतीत रणवीर सिंगला पाठिंबा दिला आहे. “ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे”, असे सोनू सूद यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला.
आणखी वाचा – रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया, …
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदला रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत त्याचे मत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, “फोटोशूट कसे करायचे ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपण अशा समजात राहतो जिथे तुम्ही काही केल तर तुमच्याकडे बोट दाखवणारे बरेचजण असतात. पण जेव्हा तुम्ही असं काही करण्याचा विचार करता, तेव्हा तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील याचा अंदाज असतो. त्यामुळे जर त्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही तयार असाल तर असे काही करण्यास हरकत नाही.”
आणखी वाचा – रणवीर सिंगचा न्यूड लूक पाहून नेटकरी सुसाट, मजेशीर कमेंट वाचून …
अभिनेता सोनू सूदचा ‘फतेह’ हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याच म्हटलं जात आहे. तर आगामी काळात रणवीर सिंगचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसेल.