मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सगळ्यांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे.
यात अभिनेता सोनू सूदने ट्वीट करत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे. “काळ जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा साक्षीदारांची गरज नसते”, अशा आशयाचे ट्वीट सोनूने केले आहे. सोनूने केलेल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ
दरम्यान, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी ते आजच तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. यानंतरच तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकतील.