‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम बंद होता. आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे. या कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – VIDEO : भर कार्यक्रमात रणवीरने उडवली विजय देवरकोंडाची खिल्ली, कपड्यांवरून ट्रोल करत म्हणाला…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हंटल्यावर प्रेक्षक निराश झाले होते. पण त्यानंतर सोनी मराठी वाहिनीचे कंटेंट हेड अमित फाळके यांनी ‘न्यू सीझन सून…’ असं म्हणत याबाबतची एक पोस्ट शेअर केली होती. आता या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकार या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव, शिवाली परब, दत्तू मोरे यांसारखे कलाकार या प्रोमोमध्ये दिसत आहेत. प्रोमोमध्ये रूग्णालय दिसत आहे. तसेच नम्रता आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना दिसत आहे.

आणखी वाचा – रणवीर सिंगचा न्यूड लूक पाहून नेटकरी सुसाट, मजेशीर कमेंट वाचून तुम्हालाही हसू होईल अनावर

सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “आम्ही सगळे येतोय रिटर्न, घेऊन कॉमेडीचा अस्सल पॅटर्न! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- चार वार हास्याचा चौकार!” १५ ऑगस्टपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.