‘राजकन्या’ म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील ‘ती’ सुंदर मुलगी. मात्र सोनी मराठी घेऊन येत आहे तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गी राजकन्येची कथा. डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेली राजकन्या पोलिस होते. बाबांच्या या राजकन्येची गोष्ट ‘एक होती राजकन्या’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

किरण ढाणे या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. २१ व्या शतकातल्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधीत्त्व अवनी करते. बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी ती स्वीकारते. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेही अपुरी पडत नाही. तिचा संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आला आहे.

अवनी म्हणजे किरण एका मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. ‘यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. ‘एक होती राजकन्या’च्या निमित्तानं, एका खंबीर मुलीची भूमिका मला साकारायला मिळतेय. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा किरणनं व्यक्त केली आहे.

Story img Loader