गेल्या कित्येक काळापासून लोकप्रिय ठरत असलेला आणि गाजत असलेला शो म्हणजे इंडियन आयडॉल. या शोमुळे कलाविश्वाला अनेक उत्तम गायक मिळाले आहे. त्यामुळे हा शो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येक पर्वाप्रमाणेच यंदा पर्वदेखील गाजताना दिसत आहे. त्यातच आता या शोमध्ये टॉप १५ स्पर्धक निवडण्यात आले असून त्यांच्यात चुरशीचा सामना रंगल्याचं दिसून येत आहे.
‘इंडियन आयडॉल’च्या यंदाच्या पर्वात आता केवळ १५ स्पर्धक शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून त्यातून एकाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास आता आणखीन खडतर होणार आहे. प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करत असून एकमेकांमध्ये आता चुरशीचा सामना रंगत असल्याचं दिसून येत आहे.
वाचा : ‘तारक मेहता..’मधून जेठालालची गच्छंती?
मोहम्मद दानिश, शिरीषा भागवतुला, अंजली गायकवाड, सम्यक प्रसन्ना, वैष्णव गिरीश, अरुणिता कानजीलाल, अनुष्का बॅनर्जी,सायली किशोर कांबळे, निहाल तौरो, साहिल सोलंकी, पवनदीप रंजन, सवाई भट्ट, षण्मुखप्रिया, नचिकेत लेले, आशीष कुलकर्णी.