जिया आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीवर खटला नोंदविण्यात आल्यानंतर त्याला ‘हिरो’च्या रिमेकमधून हटविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, ‘हिरो’ रिमेकद्वारे लाँच करण्याच्या सलमान आणि आपल्या वचनावर ठाम असल्याचे दिग्दर्शक घई म्हणाले आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाचा सूरजच्या बॉलीवूड पदार्पणामध्ये कोणताही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.
सुभाष घई म्हणाले की, सूरजचा काहीही दोष नसताना त्याला शिक्षा का मिळावी ? तो एक चांगला आणि संभाव्यपूर्ण अभिनेता आहे. आम्ही त्याला दिलेल्या वचनाशी बांधील असून त्यावर कायम आहोत. सलमान आपल्या शब्दांवर कायम राहणा-या व्यक्तिंमधला आहे. मग आम्ही मागे कसे हटणार? चित्रपटाच्या चित्रिकरणास केव्हा सुरुवात होईल हे सध्या सांगता येणार नाही. यावर मी सलमानसोबत चर्चा करणार आहे. पण, सूरजचे चित्रपटातील स्थान पक्के राहील.
१९८३साली सुभाष घई दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेशाद्री यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सूरज पांचोलीसोबत सुनील शेट्टीची मुलगी अथिया दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2013 रोजी प्रकाशित
सलमान त्याच्या शब्दावर कायम
जिया आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीवर खटला नोंदविण्यात आल्यानंतर त्याला 'हिरो'च्या रिमेकमधून हटविण्यात आल्याची चर्चा होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-07-2013 at 07:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sooraj pancholi is very much a part of hero remake salman will not go back on his words subhash ghai