दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिन दिवसात जवळपास ७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबल विजयबालन यांनी सूर्यवंशी चित्रपटाची दोन दिवसांची कमाई सांगितली आहे. ‘पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात २६ कोटी ३८ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी २४ कोटी ५३ लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने तिन दिवसात एकूण ७७ कोटी २४ लाख रुपयांची कमाई केली आहे’ या आशयाचे ट्वीट मनोबल यांनी केले आहे.
Video: वांगणीचं जंगल ते रेड लाइट एरिया आणि बरंच काही; ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाचे पडद्यामागचे रंजक किस्से

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने जगभरात पहिल्याच दिवशी ८ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली होती. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशात ३,५०० स्क्रीन्सवर आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रात ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटासोबत हॉलिवूड चित्रपट एटर्नल्स देखील प्रदर्शित झाला होता. पण सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र करोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.