रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ सिनेमा रिलीज झाला असून सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशाच या सिनेमाचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे रिमिक्स गाणं देखील यूट्यूबवर रिलज झालंय. या गाण्याला काही तासाच चार मिलियन अधिक व्हूव्ज मिळाले आहे. या गाण्यात कतरिना आणि अक्षय कुमारचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय.
‘सुर्यवंशी’ सिनेमात १९९४ सालातील मोहरा सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याचं रिमिक्स व्हर्जन घेण्यात आलंय. मोहरा सिनेमातील गाण्यात अक्षय कुमार आणि रवीनाचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाला होता. या गाण्य़ाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. गाण्यातील रवीनाच्या बोल्ड लूकने अनेकांना घायाळ केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच गाण्याच्या रिमिस्क व्हर्जनमधून कतरिनाने अनेकांना घायाळ केलंय. अनेकांनी कमेंट करत कतरिनाचं कौतुक केलंय.
फ्लाइटमधील व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांतच गायिकेचा विमान अपघातात मृत्यू
या गाण्यातील कतरिना कैफच्या परफॉर्मन्स आणि डान्सचं अनेकांनी कौतुक केलं असलं तरी अनेकजण रवीनाचा डान्स आणि बोल्ड अंदाज विसरलेले नाही. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत रवीनाचा डान्सट बेस्ट असल्याचं म्हंटलंय. तर अनेकांनी गायक उदित नारायण आणि अलका याज्ञिक याचं ही कौतुक केलंय. एक युजर म्हणाला, “मी कतरिनाची फॅन असले तरी पिवळ्या साडीतील रवीना टंडनच्या डान्सशी तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हा ती फक्त २१-२२ वर्षांची होती. ओरिजनलच बेस्ट आहे.” तर दुसरा युजर म्हणाला, “रवीनाला काही तोड नाही. रवीनाने दोन दशकांपूर्वी जसं परफॉर्म केलं तसं करणं कतरिनाला शक्यच नाही.” तसचं रवीनानाच बेस्ट असल्याचं काही युजर म्हणाले आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी आजही उदित नारायण आणि अलका याज्ञित यांचा आवाज बेस्ट असल्याचं म्हंटलंय. एक युजर म्हणाला,”ही अलका आणि उदित जींची जादू आहे. त्यांच्या आवाजाला काही तोड नाही” आणखी एक म्हणाला, “जेव्हा मी उदित नारायण सरांचा आवाज ऐकला तेव्हा अचानक मी 90 च्या दशकात गेलोय असं मला वाटलं”
१९९४ सालामध्ये आलेल्या ‘मोहरा’ सिनेमाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमातील गाणीदेखील गाजली होती. तर सुर्यवंशी सिनेमाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.