प्रियांका चोप्राची जाऊ हॉलीवूड अभिनेत्री सोफी टर्नर पतीपासून विभक्त झाली आहे. मागच्या वर्षी तिने निक जोनासचा भाऊ जो जोनासपासून घटस्फोट घेतला. आता एका मुलाखतीत सोफीने घटस्फोटाबद्दल आणि जोनास कुटुंबासोबतच्या तिच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोनास ब्रदर्सच्या पत्नी म्हणून केला जाणारा उल्लेख अजिबात आवडायचा नाही, त्याचा तिरस्कार वाटायचा असा खुलासा सोफीने केला आहे. ‘ब्रिटिश वोग’शी बोलताना ती म्हणाली, “जोनास ब्रदर्स आणि त्यांच्या बायकांकडे लोकांचं खूप लक्ष होतं. आम्हा तिघींना नेहमी त्या तिघांच्या पत्नी म्हणून संबोधलं जायचं. पण मला ते अजिबात आवडायचं नाही. ती प्लस वनसारखी फीलिंग होती.” जो जोनासमुळे असं वाटायचं नाही, असंही सोफीने सांगितलं. “त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्याने मला कधीच ती जाणीव करून दिली नाही. पण केविनची पत्नी डॅनियल जोनास, प्रियांचा चोप्रा आणि मला नेहमीच त्या बँडसोबत असलेला एक ग्रूप म्हणून पाहिलं जायचं,” असं ती म्हणाली.

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

सोफी टर्नर अनेकदा प्रियांका चोप्रा आणि डॅनियल जोनास यांच्यासह जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होत असे. चाहते त्यांना जे-सिस्टर्स म्हणायचे. जोनास ब्रदर्सच्या ‘सकर’ गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये सोफी, प्रियांका आणि डॅनियलनेही काम केलं होतं.

सैफच्या पहिल्या बायकोशी शर्मिला टागोर यांचं कसं आहे नातं? सारा अली खान खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईला…”

जो जोनस आणि सोफी टर्नर एकमेकांना २०१६ मध्ये भेटले होते. निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनस व सोफी दोघांनी २०१७ मध्ये एंगेजमेंट केली व २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुली आहेत. २०२० मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली आणि २०२२ मध्ये दुसरी मुलगी झाली. लग्नाच्या चार वर्षांनी ते दोघेही वेगळे झाले.

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

आई होण्यास तयार नव्हती सोफी

यापूर्वी सोफी टर्नरने एका म्हटलं होतं की विशीत असताना ती आई होण्यास तयार नव्हती, त्यामुळे पहिल्यांदा गरोदर असताना तिने गर्भपात करण्याचा विचार केला होता. ते बाळ ठेवायचं नाही, असा विचार करून जो जोनासशी चर्चा केली होती, असं तिने सांगितलं होतं.
बालीमध्ये असताना सोफीला ती गरोदर असल्याचं कळालं होतं. ब्रिटीश वोगला दिलेल्या मुलाखतीत सोफी म्हणाली, “कदाचित मी खूप लहान असल्यामुळे मी त्याबद्दल फार विचार केला होता. मी जो जोनासवर प्रेग्नेन्सी टेस्ट फेकली होती आणि आपण काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? आपण हे बाळ होऊ द्यायला पाहिजे, असं तुला वाटतं का? असे प्रश्न विचारले होते.”

त्या वयात आई व्हायचं की नाही, याची खात्री नव्हती. यासंदर्भात खूप गोंधळले होते आणि त्याबाबत थेरपिस्टशी बोलले होते, असंही सोफीने सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sophie turner hated that priyanka chopra and she were always called jonas brothers wives hrc