प्रियांका चोप्राची जाऊबाई आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नरने काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा केली आहे. निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनस व सोफी दोघांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. चार वर्षांनी दोघेही विभक्त झाले. दोघांनी मागच्या आठवड्यात ते घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. अशातच आता सोफीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका अभिनेत्याला किस करताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सोफी टर्नर नवीन शोमधील तिचा सहकलाकार फ्रँक डिलनला किस करताना दिसत आहे. हे कपल स्पेनमध्ये शूटिंग करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सोफी टर्नर आणि फ्रँक डिलन समुद्रात मस्ती करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांवर पाणी उडवताना, हसताना दिसत आहेत. त्याचदरम्यान, ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
‘जोन’ ही आगामी सीरिज आहे, यामध्ये सोफी ब्रिटिश ज्वेल चोर जॉन हॅनिंग्टनची भूमिका साकारत आहे. तर तिच्या पतीची भूमिका फ्रँक करतोय. सीरिजचे शूटिंग या वर्षी मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू झाले होते. फ्रँक ‘फिअर द वॉकिंग डेड’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द हाफ-ब्लड प्रिन्स’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.
प्रियांका चोप्राच्या दीराचा होणार घटस्फोट, लग्नानंतर ४ वर्षांनी जो जोनस-सोफी होणार विभक्त
दरम्यान, जो जोनस आणि सोफी टर्नर एकमेकांना २०१६ मध्ये भेटले होते. त्यांनी २०१७ मध्ये एंगेजमेंट केली व २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आहेत. २०२० मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली आणि २०२२ मध्ये दुसरी मुलगी झाली. लग्नाच्या चार वर्षांनी ते दोघेही वेगळे होत आहेत.