साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांत हिच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे. सौंदर्याने आपल्या आलिशान एसयूव्ही गाडीची चावी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. तेनमपेट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, २३ एप्रिल रोजी ती रेंज रोव्हर कारमधून तिच्या घरातून तेनमपेट येथील महाविद्यालयात जात होती. त्यादरम्यान एसयूव्ही या आलिशान वाहनाची बॅगेत ठेवलेली चावी गायब झाली आहे. ही चावी शोधण्यासाठी तिने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचे दागिने घरातून चोरीला गेले होते. यासंदर्भात ऐश्वर्याने चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेतली होती. ऐश्वर्याने तिच्या चेन्नईच्या घरातील सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याचे म्हटले होते. पोलिसांनी याप्रकरणी ऐश्वर्याची मोलकरीण आणि ड्रायव्हरला अटक केली होती. त्यांनीच घरातून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.

हेही वाचा- अशनीर ग्रोव्हर अन् त्याचे कुटुंबीय पुन्हा अडचणीत; ८१ कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

ईश्वरी १८ वर्षांपासून ऐश्वर्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यामुळे तिला घराची संपूर्ण माहिती होती. यापूर्वी अनेकदा तिने चोरीचा प्रयत्न केला होता, कारण तिला लॉकरची चावी कुठे ठेवली जाते ते माहीत होते, असे पोलिसांनी सांगितले. मोलकरणीने चोरी करून घर खरेदी केले होते. या खरेदीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी साऊथसोबत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचा दिलीप कुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्स निर्मित ‘जेलर’ चित्रपट १० ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. सध्या ते ऐश्वर्या रजनीकांतच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, या चित्रपटात ते एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत. यात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soundarya rajinikanth lodges police complaint about missing suv key dpj
Show comments