सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता व १० वर्ष तामिळनाडूचं मुख्यमंत्री पद भूषिवणारे एम.जी.रामचंद्रन यांची आज जयंती आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर एम.जी.आर. यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील सक्रिय वावर पाहून जनतेने त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं. तब्बल दहा वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर ७०व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने २४ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचं निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम.जी.आर. यांची लोकप्रियता प्रचंड होती. केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक राजकारणी म्हणूनही त्यांनी जनतेच्या मनात घर केलं होतं. त्यामुळेच त्यांच्या निधनाने चाहत्यांबरोबरच तामिळनाडूच्या जनतेलाही जबर धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, एम.जी.आर. यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी ३० लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. कुणी हाताची नस कापली, तर कुणी विषप्राशन करत जीवन संपवलं होतं. एम.जी.आर. यांना शेवटचं पाहण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. या गर्दीला आटोक्यात आणताना पोलिसांना लाठीचार्ज व फायरिंग करावी लागली होती. यात तब्बल २९ लोक मृत्यूमुखी पडले.

हेही वाचा>> चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर उर्फीचं ट्वीट, म्हणाली “आत्महत्या करण्यासाठी…”

एम.जी.आर. यांनी जयललिता यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी घोषित केलं होतं. एम.जी.आर. यांच्यानंतर जयललिता यांनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. जयललिताही एक उत्तम अभिनेत्री होत्या. मनोरंजन विश्वात जम बसवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. एम.जी.आर. यांनीच त्यांना राजकारणाचं बाळकडू दिलं होतं. एम.जी.आर. यांच्याप्रमाणेच जयललिता यांच्या निधनानंतरही त्यांच्या चाहत्यांनी आत्महत्या केल्याचा रेकॉर्ड आहे.

हेही वाचा>> “आय एम गौरव मोरे…” दुबईतही फिल्टरपाड्याच्या बच्चनची हवा; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…

एम.जी.आर. यांनी एक सो एक हिट चित्रपट देऊन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावलं होतं. त्यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कझगम या राजकीय पक्षाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या कॉँग्रेस पक्षाक्षी घनिष्ठ संबंध होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actor and former tamil naadu cm mgr birth anniversary fans suicide after his death kak