कन्नड चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते दर्शन तुगुदीपा (Darshan Thoogudeepa) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. दर्शन यांच्या पाळीव श्वानाने एका महिलेचा चावा घेतला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेकडून दर्शन यांच्या विरोधात पोलिस ठाण्यामध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर २८९ आयपीसी अंतर्गत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Dunki Drop 1: वाढदिवशीच किंग खानचा धमाका, ‘डंकी’चा टीझर प्रदर्शित, शाहरुख खानच्या नव्या लूकची चर्चा

हा सगळा प्रकार २८ ऑक्टोबरला घडला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता दर्शन बंगळुरूच्या आरआर नगर भागात राहतात. संबंधित महिला त्यांच्या घराजवळ गाडी पार्क करण्यासाठी आली, तेव्हा दर्शन यांच्या पाळीव श्वाने तिचा चावा घेतला. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर संबंधित महिलेने अभिनेत्यावर निष्काळजीपणाचा आरोप करून FIR दाखल केली आहे.

हेही वाचा- सनी देओलने अक्षय कुमारकडे केलेली ‘OMG 2’ पुढे ढकलण्याची विनंती; पण खिलाडी कुमार म्हणाला…

दर्शन तुगुदीपा नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. याआधी एका व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी दर्शन यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. आता त्यांच्या पाळीव श्वानामुळे एफआयआर दाखल झाल्यानंतर दर्शन पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. दर्शन तुगुदीपाने २००१ मध्ये ‘मॅजेस्टिक’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत त्यांनी ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.