‘रांझणा’ या हिंदी चित्रपटापासूनच धनुषने याची छाप प्रेक्षकांवर पडायला सुरुवात केली होती. आता तरी धनुष हा फक्त दाक्षिणात्य चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता हॉलिवूडमध्येसुद्धा महत्वाच्या भूमिका करू लागला आहे. नुकताच त्याने हॉलिवूडचा ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे, याबरोबरच ती प्रादेशिक चित्रपटातसुद्धा झळकतो आहे. आमिर खानच्या चित्रपटाला परदेशातही फार वाईट प्रतिसाद मिळाला आहे पण दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने मात्र बाजी मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनुषचा नुकताच आलेला ‘थिरुचित्रम्बलम’ हा चित्रपट सध्या जगभरात गाजतो आहे. तामिळनाडूमध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाने जगभरात १०० कोटीचा आकडाही पार केला आहे. याबरोबरच हा चित्रपट धनुषच्या कारकीर्दीतला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

अमेरिकेत तर या चित्रपटाने कहर केला आहे. कमल हासनच्या ‘विक्रम’ आणि थालापती विजयच्या ‘बीस्ट’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत धनुषचा ‘थिरुचित्रम्बलम’ चित्रपट २०२२ चा अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तामीळ चित्रपट ठरला आहे.

‘थिरुचित्रम्बलम’मध्ये धनुष एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारत आहे. नित्या मेनन, राशी खन्ना, प्रकाश राजसारखे तगडे कलाकारदेखील या चित्रपटात पाहायला मिळतील. दिग्दर्शक मिथुन जवाहर आणि धनुष यांचा एकत्र काम केलेला हा चौथा चित्रपट आहे. यापुढच्याही काही चित्रपटात मिथुन-धनुष ही जोडी प्रेक्षकांना दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणासाठी निर्मात्यांना ‘छैय्या छैय्या’ हे गाणं चित्रपटाच्या शेवटी हवं होतं, राम गोपाल वर्मा यांचा खुलासा

धनुष सध्या त्याच्या आगामी तामीळ आणि तेलुगू चित्रपट ‘वाथी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तेलुगूमध्ये या चित्रपटाचं नाव ‘सर’ असेल. या चित्रपटात धनुष एका प्राध्यापकाची भूमिका साकारणार आहे. असं म्हंटलं जातंय की तेलुगू चित्रपटसृष्टीतला हा धनुषचा पहिलाच चित्रपट असणार आहे. ‘असुरन’, ‘कर्णन’प्रमाणेच त्याच्या या चित्रपटाचीसुद्धा धनुषचे चाहते चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actor dhanush film called thiruchitrambalam doing exceptional business in america avn