सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता फहाद फासिलला गंभीर आजाराचं निदान झालं आहे. ४१ व्या वर्षी त्याला या आजाराबद्दल कळालं. फहादने स्वतःच याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. काही आठवड्यांपूर्वी फहादचा ‘आवेशम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचदरम्यान फहादने त्याच्या आजाराबाबत खुलासा केला आहे.
फहादला अटेंशन-डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच एडीएचडीचे निदान झाले आहे. एडीएचडी हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, फहद फासिलने एका कार्यक्रमात आपल्या आजाराविषयी सांगितलं. जर हा आजार लहान वयात झाला तर त्यावर सहज उपचार होऊ शकतात, परंतु वयाच्या ४१ व्या वर्षी या आजाराचं निदान झाल्यावर त्यावर उपचार करणं कठीण आहे, अशी माहिती कोथमंगलममधील पीस व्हॅली चिल्ड्रन व्हिलेजमध्ये अभिनेत्याने दिली.
“घराच्या अंगणात असल्यासारखं नाचत होत्या”, Cannes मधील डान्सवर टिप्पणी करणाऱ्याला छाया कदम म्हणाल्या…
फहादने गावात फिरत असताना एका डॉक्टरांना विचारलं की एडीएचडीवर उपचार करणं सोपं आहे का? त्यावर डॉक्टरांनी काय उत्तर दिलं, ते त्याने सांगितलं. “डॉक्टर मला म्हणाले की एडीएचडी या आजाराचं निदान कमी वयात झालं तर त्यावर उपचार करून सहज मात करता येते. मग मी त्यांना विचारलं की ४१ व्या वर्षी हा आजार बरा होऊ शकतो का? कारण मला आता या आजाराचं निदान झालं आहे,” असं फहाद फासिलने सांगितलं.
OTT वर मागच्या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेल्या ‘या’ पाच वेब सीरिज, तुम्ही बघितल्यात का? वाचा नावं
अटेंशन-डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काय?
अटेंशन-डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच एडीएचडी हा आजार मेंदूच्या लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, वर्तन आणि प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. हा आजार लहान मुलांमध्ये सामान्य आहे. लहान मुलांना हा आजार झाल्यास त्यावर उपचार करून मात करता येते, मात्र प्रौढांना तो झाल्यास त्याच्यावर उपचार करणं कठीण आहे.
‘पुष्पा २’ मध्ये झळकणार फहाद
दरम्यान, फहादच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘आवेशम’ हा मल्याळम चित्रपट ११ एप्रिल रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. प्रेक्षक व समीक्षकांकडूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. फहादच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास तो अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ या सिनेमात भंवर सिंह नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा द राइज’ च्या यशानंतर चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.