काही प्रादेशिक चित्रपटांमधील कलाकार लोकप्रियतेमध्ये बॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकतात. यात दाक्षिणात्य कलाकारांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. त्यातच ‘केजीएफ’ सुपरस्टार यश याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे सध्या हा अभिनेता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सुपरहिट ठरत आहे. त्यामुळे या लॉकडाउनच्या काळात यश आणि त्याचा ‘केजीएफ’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लॉकडाउन फेव्हरेट’ ठरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक नागरिक घरात बसून कंटाळला आहे. त्यातच मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरणही बंद असल्यामुळे अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. त्यामुळे या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणी तुफान वाढली आहे. यात यशचा ‘कोलार गोल्ड फिल्ड’ म्हणजेच ‘केजीएफ’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. तसंच आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘केजीएफ – 2’ प्रदर्शित व्हावा यासाठी प्रेक्षकांची मागणी जोर धरु लागली आहे.

उत्तम कथानक, दमदार अभिनयकौशल्य आणि चित्रीकरण यांच्या जोरावर ‘केजीएफ’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात अँग्री मॅन रॉकीची भूमिका साकारणारा यशदेखील देशभरात लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळेच याचा पुढील भागही उत्तम कमाई करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आता ‘केजीएफ -2’ च्या प्रदर्शनाचे अधिकार मिळावेत यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मंमध्ये चढाओढ लागली आहे.