साउथ सिनेमामधून अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता महेश बाबू आज त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करतोय. ९ ऑगस्ट १९७५ रोजी चेन्नईत त्याचा जन्म झाला. यानिमित्ताने सोशल मीडियावर फॅन्स महेश बाबूवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने देखील आपल्या खास रोमॅण्टिक अंदाजात महेश बाबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर महेशसोबतचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये जितकं रोमॅण्टिक हे कपल दिसून येतंय, तितकीच रोमॅण्टिक कॅप्शन देखील पत्नी नम्रताने दिलीय. यात तिने लिहिलंय, “ज्याने मला प्रेमाची व्याख्याय समजावून सांगितली…तो व्यक्ती माझा आधीही होता, आताही आहे आणि कायम माझाच राहील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एमबी… खूप सारं प्रेम.”
नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची पहिली भेट २००० मध्ये ‘वामसी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांनंतर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भेटींमधून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर नम्रताने स्वतःपेक्षा ३ वर्षांनी लहान असलेल्या महेश बाबूशी २००५ मध्ये लग्न केलं. दोघेही एकमेकांना डेट करत असताना त्यांनी इतर सेलिब्रिटींसारखंच त्यांनीही त्यांचं रिलेशनशीप सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. या दोघांनाही दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नावं आहेत.
महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रतानं चित्रपटसृष्टीपासून थोडा दूरावा ठेवताना दिसून आली. पण महेश बाबू मात्र त्याला आतापर्यंत मिळालेलं प्रत्येक यशांचं श्रेय पत्नी नम्रताला देत असतो.
महेश बाबूने एक बाल कलाकार म्हणून १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘पोरटम’ मधून अभिनयाला सुरूवात केली. त्यानंतर लीड अॅक्टरच्या भूमिकेत महेश बाबूने १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा कुमारुडू’ चित्रपटातून डेब्यू केलं होतं. मागच्या वेळी महेश बाबू ‘सारीलेरू नीकेवारू’ चित्रपटातून झळकला होता. आता तो आपला आगामी चित्रपट ‘सरकारू वारी पाटा’ मध्ये दिसणार आहे. साउथच्या व्यतिरिक्त नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा त्यांची बरीच फॅन फॉलोइंग आहे. त्याचे हिंदी डब चित्रपटांना देखील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात.