साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांचा सावत्र भाऊ नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश हे गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर नरेश बाबू यांनी एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नरेश बाबू आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश लवकरच विवाहबद्ध होणार आहेत ही बातमी नरेश बाबू यांनी सोशल मीडियावरून नुकतीच शेअर केली.

नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश यांनी नुकताच त्यांचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट करून लवकरच लग्न करणार आहेत असं जाहीर केलं. नवीन वर्षाच्या चाहत्यांना शुभेच्छा देत त्या दोघांनी ही आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या त्यांच्या व्हिडीओमध्ये ते दोघेही रोमँटिक मूडमध्ये केक कापून एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे व्हिडिओच्या शेवटी त्यांनी एकमेकांना किसही केलं आणि लवकरच ते लग्न करणार आहेत असं जाहीर केलं.

आणखी वाचा : “…तेव्हा व्यक्त होताना १० हजार वेळा विचार करावा लागतो,” सई ताम्हणकरने मांडलं स्पष्ट मत

हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “नवीन वर्षाची सुरुवात करताना आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!” पण हे सगळं सांगताना ते नक्की कोणत्या तारखेला लग्न करणार आहेत हे त्यांनी अजून सांगितलेलं नाही.

हेही वाचा : राजामौलींच्या चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी? महेश बाबूसह पडद्यावर रोमान्स करणार असल्याच्या चर्चांना उधाण

नरेश बाबू यांचं हे चौथं लग्न आहे. या आधी तिन्ही वेळा पत्नींशी विविध कारणांमुळे झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी घटस्फोट घेतले. नंतर अभिनेत्री पवित्रा लोकेश त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. अखेर यावर्षी ते पवित्राशी लग्नगाठ बांधणार असल्याचे कळताच त्यांचे चाहते खुश झाले असून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader