दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार मानला जाणारा विजय देवराकोंडा आपल्या लूकमुळे अभिनयाने चर्चेत असतो. त्याचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला मात्र प्रेक्षकांमधील त्याची लोकप्रियता अद्याप कायम आहे. आता एका नव्या कारणामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने नुकतंच एका रुग्णालयाच्या कार्यक्रमाला भेट दिली होती. या कार्यक्रमात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

विजय देवराकोंडादेखील आपली मतं ठामपणे मांडत असतो. पेस रुग्णालयाच्या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने अवयव दानाबद्दल माहिती दिली. तो असं म्हणाला की “मला असं सांगण्यात आलं आहे की अनेक शस्त्रक्रिया ह्या केवळ अवयदान करणार्‍यांमुळे होतात. दक्षिण आशियात अवयवदान फार कमी प्रमाणात होते. मी माझे अवयव दान करू इच्छितो. माझे अवयव वाया घालवण्यात मला काहीच अर्थ दिसत नाही. मी तंदुरुस्त राहतो आणि स्वतःला निरोगी ठेवतो. माझ्या आयुष्यानंतर माझे अवयव चांगले असल्यास त्यांचा उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी आणि माझ्या आईने आपले अवयव दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ही एक खूप सुंदर गोष्ट आहे तुमच्या या उदारपणामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही जगत असता. मी प्रत्येकालाच अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करतो. ” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू

किंग खानच्या ‘पठाण’ची तूफान चर्चा; पण चाहत्यांनी केली शाहरुख दीपिकाच्या ‘या’ चित्रपटाच्या री-रिलीजची मागणी

विजयच्या या कृतीमुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. विजयचे खासगी आयुष्यदेखील चांगलेच चर्चेत असते. रश्मिका मंदानाशी मागच्या बऱ्याच काळापासून जोडलं जात आहे. दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही.

दरम्यान विजय देवरकोंडा लवकरच समांथा रुथ प्रभूसह मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. दोघेही ‘खुशी’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीरमध्ये झालं आहे. येत्या २३ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader