‘देव तारी त्याला कोण मारी’ काहीसं असंच घडलंय प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्याबरोबर. अभिनेता विशाल कृष्ण रेड्डी नुकताच एका मोठ्या अपघातातून मरता मरता वाचला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टारने त्याचा आगामी चित्रपट ‘मार्क एंटनी’च्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर करत स्वतःबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाची माहिती दिली. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

विशाल कृष्ण रेड्डीने त्याच्या ट्विटर हँडलवर ‘मार्क एंटनी’ चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याबरोबर मोठा अपघात होता होता राहिला आहे. सुदैवाने अभिनेता यातून वाचला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विशालने लिहिलं, “काही सेकंद आणि काही इंचाने देवाने माझा जीव वाचवला. देवाचे खूप खूप आभार. मी या घटनेनंतर स्तब्ध झालो आहे आणि आता पुन्हा स्वतःच्या पायांवर शूटिंग सेटवर परतलो आहे.”

Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Viral Video
Viral Video : देव तारी त्याला कोण मारी… रस्ता ओलांडताना दोन बसमध्ये अडकला; Video पाहून नेटकरी थक्क
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले
Shocking video of accident Mother daughter fell down due to overspeed bus viral video on social media
आता तर हद्दच झाली! माय-लेकीबरोबर रस्त्यात घडली दुर्घटना, भरवेगात बस आली अन्…, थरारक VIDEO व्हायरल

आणखी वाचा- बिकिनी फोटो शेअर करत दिशा पाटनीने दाखवले स्ट्रेच मार्क्स; नेटकरी म्हणाले, “हे दाखवण्यासाठी…”

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की चित्रपटाचं शूटिंग चालू आहे आणि सेटवर कास्ट आणि क्रूचे सगळे सदस्य शूटिंग करण्यात व्यग्र आहे. यातील फाइट सीक्वेन्समध्ये ट्रकचा वापर केला जात होता. ज्यात ट्रक भिंत तोडून बाहेर पडल्यानंतर थांबणं अपेक्षित होतं. पण अचानक या ट्रकचा ताबा सुटला आणि तो वेगात त्याच दिशेत पुढे येऊ लागला. त्याच ठिकाणी विशाल उभा होता. ट्रकवरील ताबा सुटलेला पाहून सेटवर गोंधळ उडाला. विशालचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Story img Loader