अमला पॉल सध्या तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमला मागच्या १३ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे.अमला पॉलने प्रामुख्याने तामिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. पिंकव्हिलाच्या माहितीनुसार अभिनेत्री अमला पॉल आता अजय देवगणच्या भोला चित्रपटात दिसणार आहे. अमलाने एका चित्रपटात दिलेल्या न्यूड सीनमुळे तिला टीकेचा सामना करावा लागला होता.
‘आडाई’ या तमिळ चित्रपटात सीन दिला होता. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या सीनबद्दल भाष्य करताना तिने द हिंदूला असं सांगितलं होत की “हा सीन चित्रित करताना दिग्दर्शकाने मला खास पोशाख घालण्याचा सल्ला दिला होता. मी दिग्दर्शकाला काळजी करू नका असे सांगितले. मला थोडा ताण वाटत आहे पण एकदा हा ताण निघून गेला की सीन नीट चित्रित करेन. मला फक्त याची चिंता होती की हा सीन चित्रित करताना सेटवर नेमकं कोण असेल? सेटवर १५ जण उपस्थित होते जर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर कदाचित मी तो सीन चित्रित केलं नसता.”
बॉलिवूड इंडस्ट्री संपली का? रकुल प्रीत म्हणाली, “लोकांना आता…”
अमलाने वयाच्या १७ व्या वर्षी ‘नीलतमारा’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तिने तमिळ व्यतिरिक्त काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले.अमला पॉल शेवटची तेलुगू चित्रपट ‘पिट्टा कथलू’ मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसली होती. अमला म्हणते की तिला तामिळ चित्रपटांमधून अधिक संधी मिळाल्या, ती सांगते की बाहेरची व्यक्ती असतानाही सर्वांनी तिला मदत केली.
अमला मूळची केरळची असून तिने इंग्रजी विषयातून पदवी संपादन केली आहे. २०११ मध्ये तिचे नाव ए एल विजय या दिग्दर्शकाबरोबर जोडले गेले होते. अमला पॉलने यावर्षी ‘रंजिश ही सही’ या वेब सीरिजमधून पदार्पण केले.