नैसर्गिक सौन्दर्य, निखळ हास्य, लाजवाब अभिनय यासाठी लोकप्रिय असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही आजही कित्येकांची फेवरेट आहे. ‘बाहुबली’सारख्या चित्रपटातून तिचं सौंदर्य आणि तिचा तगडा अभिनय याचे बरेच लोक चाहते झाले. गेल्या काही वर्षांत भागमती, सायलेंससारखे चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाल्याने बऱ्याच अभिनेत्रींनी तिला आता मागे टाकलं आहे अशी चर्चा होताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर बहुचर्चित ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटासाठी अनुष्काला विचारण्यात आलं होतं, पण तिने यासाठी स्पष्ट नकार दिला होता.

‘पोन्नियिन सेल्वन २’ हा दूसरा भाग नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नंदिनी या मुख्य भूमिकेत आहे. हीच भूमिका अनुष्का शेट्टीला देण्यात आली होती. केवळ एका मीटू चळवळीखातर अनुष्काने या भूमिकेवर पाणी सोडल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

आणखी वाचा : Photos : बाहुबलीमधील ‘देवसेना’ आहे तरी कुठे? सलग फ्लॉप चित्रपट देणारी अनुष्का शेट्टी कमबॅक करणार का?

‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार चित्रपटाचे गीतकार वैरामुथु यांच्यामुळे अनुष्काने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. असं म्हंटलं जातं की गेल्या बऱ्याच दिवसांपासून वैरामुथु यांच्यावर बऱ्याच मुलींनी यौन शोषणाचे आरोप केले होते. यामुळेच मीटू चळवळीशी संबंधीत एका आरोपी कलाकाराबरोबर काम करण्यास अनुष्का इच्छुक नव्हती. यामुळेच तिने या मोठ्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

दरम्यान अनुष्काने चित्रपटासाठी जास्त मानधन मागीतल्याची चर्चासुद्धा होत होती. अद्याप अनुष्का किंवा तिच्या इतर सहकाऱ्यांपैकी कुणीही या गोष्टीची पुष्टी केलेली नाही. अनुष्कानंतर मणीरत्नम यांनी या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायची निवड केली. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पीएस १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती, आता याच्या दुसऱ्या भागाकडूनही आणखी जबरदस्त कमाईची अपेक्षा केली जात आहे.

Story img Loader