दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्या दोघांनी जुळ्या मुलांचे आई-वडील झाल्याची घोषणा केल्यानंतर ते दोघेही चर्चेत आले. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांनी त्यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अलीकडेच नयनतारा तिचा पती विघ्नेश शिवनसह एका मंदिरात गेली होती. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पांगुनी उठीरामच्या निमित्ताने हे जोडपे आपल्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेले, पण यादरम्यान नयनतारा तिच्या एका चाहत्यावर चांगलीच भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नयनतारा त्या चाहत्यावर नेमकी का भडकली? याचे कारण स्पष्ट झाले आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Crime NEws
“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Robbers snatched the girl phone from outside the house video goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; मोबाईल चोरी करण्याची “ही” नवी पद्धत पाहा आणि आत्ताच सावध व्हा
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Three youths arrested for abusing a college student in Tathawade pune news
पिंपरी: ताथवडेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर अत्याचार; तीन तरुण अटकेत
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…

आणखी वाचा : “त्याची काय लायकी…” उर्फी जावेदच्या फॅशनबद्दल भाष्य करणाऱ्या रणबीर कपूरला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

जेव्हा नयनतारा आपल्या पतीसह मंदिरात दर्शन घेत होती तेव्हा तिच्या काही चाहत्यांनी व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली, त्यापैकीच एका चाहत्यावर नयनतारा भडकली. नयनताराच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडिओ बनवणे तिला आवडले नाही आणि तिला राग आला. नयनताराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्या या वागण्यावर नाराजीही व्यक्त केली आहे.

कुंभकोणमजवळील कामाक्षी अम्मान मंदिराला भेट देताना इतका त्रास होईल अशी अपेक्षा नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांना नव्हती. जमावार नियंत्रण होत नसल्याने नयनताराचा संयम संपला. अभिनेत्रीने चाहत्याला ओरडायला सुरुवात केली, त्यामुळे बराच गदारोळ झाला. संतप्त नयनताराने चाहत्याचा फोन तोडण्याचीही धमकी दिली, तिचा पती विघ्नेश शिवन नंतर हे प्रकरण हाताळताना दिसला, तर पोलिसही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

आणखी वाचा : “पूल पार्टी, मद्यपान अन् जबरदस्ती केलं…” नेटफ्लिक्सच्या ‘डेटिंग शो’मधील साक्षी गुप्ताचा स्पर्धकावर गंभीर आरोप

नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे. नयनतारा शेवटची हॉरर थ्रिलर ‘कनेक्ट’ या चित्रपटामध्ये दिसली होती. सध्या तिचा ‘जवान’ हा चित्रपट चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच किंग खान शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या या चित्रपटासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Story img Loader