दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर अनेक अभिनेत्रीचे डीपफेक व्हिडीओ समोर आले. पण आता रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. या अटकेवर अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. आरोपी हा २३ वर्षांचा असून इमानी नवीन असं त्याचं नाव आहे. या अटकेनंतर रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिल्ली पोलिसांचे आभार मानले. अभिनेत्री म्हणाली, “या प्रकरणातील आरोपीला पकडल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच त्या लोकांचे देखील आभार, जे या परिस्थितीत माझ्या बरोबर ढाल बनून उभे होते.”

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं पहिलं घर! म्हणाला, “लहानपणापासून आम्ही…”

पुढे रश्मिका म्हणाली, “सर्व मुलं आणि मुली, तुमचे फोटो तुमच्या संमतीशिवाय वापरले किंवा मॉर्फ केले असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. पण तुमच्या आजूबाजूला तुमचा पाठिंबा देणारे लोक आहेत; जे तुम्हाला कारवाई करण्यासाठी मदत करतील, हे लक्षात ठेवा.”

हेही वाचा – सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घेतला ‘खुला’, काय आहे तलाकची ही प्रक्रिया?

दरम्यान, रश्मिका हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान डीपफेक व्हिडीओविषयी म्हणाली होती की, मी जेव्हा पहिल्यांदा डीपफेक व्हिडीओ पाहिला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटलं माझ्या टीमकडून मला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही. सर्वात पहिल्यांदा पाठिंबा देणारे व्यक्ती अमिताभ बच्चन होते. त्यानंतर अनेक जण मला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. सुरुवातीला डीपफेक व्हिडीओचा माझ्यावर खूप परिणाम झाला. हा डीपफेक सर्वसाधारण व्हिडीओ नसतो, त्यामुळे मी यावर बोलण्याचा निर्णय घेतला.

रश्मिका मंदानानंतर कतरिना कैफ, काजोल, आलिया भट्ट यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच अलीकडेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील डीपफेक व्हिडीओ समोर आला होता.

Story img Loader