दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर अनेक अभिनेत्रीचे डीपफेक व्हिडीओ समोर आले. पण आता रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. या अटकेवर अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणातील मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. आरोपी हा २३ वर्षांचा असून इमानी नवीन असं त्याचं नाव आहे. या अटकेनंतर रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिल्ली पोलिसांचे आभार मानले. अभिनेत्री म्हणाली, “या प्रकरणातील आरोपीला पकडल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच त्या लोकांचे देखील आभार, जे या परिस्थितीत माझ्या बरोबर ढाल बनून उभे होते.”
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं पहिलं घर! म्हणाला, “लहानपणापासून आम्ही…”
पुढे रश्मिका म्हणाली, “सर्व मुलं आणि मुली, तुमचे फोटो तुमच्या संमतीशिवाय वापरले किंवा मॉर्फ केले असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. पण तुमच्या आजूबाजूला तुमचा पाठिंबा देणारे लोक आहेत; जे तुम्हाला कारवाई करण्यासाठी मदत करतील, हे लक्षात ठेवा.”
हेही वाचा – सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घेतला ‘खुला’, काय आहे तलाकची ही प्रक्रिया?
दरम्यान, रश्मिका हैदराबादमध्ये ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान डीपफेक व्हिडीओविषयी म्हणाली होती की, मी जेव्हा पहिल्यांदा डीपफेक व्हिडीओ पाहिला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटलं माझ्या टीमकडून मला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही. सर्वात पहिल्यांदा पाठिंबा देणारे व्यक्ती अमिताभ बच्चन होते. त्यानंतर अनेक जण मला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. सुरुवातीला डीपफेक व्हिडीओचा माझ्यावर खूप परिणाम झाला. हा डीपफेक सर्वसाधारण व्हिडीओ नसतो, त्यामुळे मी यावर बोलण्याचा निर्णय घेतला.
रश्मिका मंदानानंतर कतरिना कैफ, काजोल, आलिया भट्ट यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच अलीकडेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील डीपफेक व्हिडीओ समोर आला होता.