दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघं नेहमी चर्चेत असतात. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. अशात आता रश्मिका आणि विजय दोघं लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रश्मिकाने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोवरून या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी ४ फेब्रुवारीला…”

अभिनेत्री रश्मिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता; ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहे. पण हाच फोटो रश्मिकाने ज्या ठिकाणी काढला आहे, ते विजय देवरकोंडाचे घर असल्याचे सांगितलं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी विजयने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो रश्मिकाने फोटो काढलेल्या ठिकाणी बसलेला पाहायला मिळाला होता. हे ठिकाण विजयच्या घरची गच्ची असल्याची बोललं जात आहे. त्यामुळे दोघं लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा – समुद्रात गाण्याचं शूटिंग करताना ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर घडली भयंकर घटना; व्हिडीओ आला समोर

हेही वाचा – Video: ‘तान्हाजी’ फेम अभिनेता सहकुटुंब रावसाहेब दानवेंच्या घरी पाहुणचाराला; भेट म्हणून दिली सोन्याची अंगठी, कपडे अन्….

रश्मिकाचा या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, “मी केव्हापासून म्हणतं होतो की, हे दोघं जवळपास ३-४ वर्षांपासून एकत्र राहत आहेत.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, “मी दोघांचा साखरपुडा झाल्याचं ऐकलं आहे. पण यात किती तथ्य आहे, याबाबत माहित आहे.” तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, “ही गच्ची कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत आहे.”

हेही वाचा – “तुम्ही आता जागे झालात का?” ‘ताली’वरील ‘त्या’ ट्रोल कमेंटवर सुव्रत जोशी स्पष्टच बोलला; म्हणाला, “परदेशात…”

काही महिन्यांपूर्वी रश्मिका विजय देवरकोंडाला नाही तर बेलमकोंडा श्रीनिवास डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांना अनेकदा फिरताना पाहिलं गेलं होतं. दरम्यान, रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Story img Loader